अरविंद सहकारी बॅंक लि.ची आर्थिक प्रगती व कार्य उल्लेखनीय…! -नितीनजी गडकरी

नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते अरविंद सहकारी बँक लि.च्या कामठी शाखेचे उद्घाटन.
• श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, अॅड. सुलेखाताई कुंभारे, श्री. सुधाकरजी कोहळे, श्री. रणजीतबाबू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.
• बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी आणल्या ग्राहकांसाठी ४ नव्या योजना.

“सहकारी बँकिंगमध्ये अरविंद सहकारी बँकेचे १००० कोटी रुपयांचे डिपॉझीट आणि १६०० कोटी रुपयांचे टर्नओव्हर ही मोठी उपलब्धी आहे. ही बॅंक ‘A ग्रेड’ मध्ये आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात अरविंद सहकारी बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. इलेक्ट्रिक वेहिकल, सोलर सारख्या व्यवसायांना बँकेने कमी दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. ग्राहकांकडून कर्जाची परतफेड ही बँकेसाठी आणि समाजासाठी महत्वाची आहे. कामठी येथे मोठे व्यवसाय आणण्याची गरज आहे. युवकांच्या कौशल्य विकासासाठी अरविंद सहकारी बँकेने विविध विषयांवर सेमिनार आयोजित केल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो. अरविंद सहकारी बँकेचा ट्रॅक रेकॉर्ड, उत्कृष्ट बॅलंस शीट, एनपीए १.७८% आणि ग्राफ चांगला असून आर्थिक प्रगती व कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे या बँकेचा उपयोग कामठीला होणार आहे. कामठीमध्ये मेट्रो रेल्वे येणार पण त्यासाठी रस्ते रुंद हवेत, अतिक्रमण नको. १-२ महिन्यात नागपूर ते कामठी-कन्हान मेट्रो रेल्वेचे काम सुरु होणार आहे. आज ४०% नागपूरला २४ तास पाणी पुरवठा होत आहे. पण डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण नागपूरला २४ तास पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होणार आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी केले. अरविंद सहकारी बॅंक लि. च्या कामठी शाखेचा उद्घाटन समारंभ माननीय केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते दि. २७ ऑगस्ट २०२३ ला संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रणजीतबाबू देशमुख (माजी कृषी मंत्री, म.रा.), प्रमुख अतिथी म्हणून श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे (माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष), अॅड. सुलेखाताई कुंभारे (माजी राज्यमंत्री, म.रा.) व आमदार श्री. सुधाकरजी कोहळे हे उपस्थित होते.

श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे म्हणाले, “लहान कारागिरांना केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेसाठी अरविंद सहकारी बँकेची गरज पडणार आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात बँकेने मोठी प्रगती केली आहे. कामठीतील जास्तीत जास्त लोकांना बँकेने कर्ज उपलब्ध करून त्यांना योग्य रोजगार देण्यात यावा. गडकरी साहेबांनी कामठी ते गुमथळा रस्त्याचे सिमेंटीकरण कामास मंजुरी द्यावी.”

अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनीसुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अरविंद सहकारी बॅंक लि.चे अध्यक्ष डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करतांना ते म्हणाले, “माझे प्रेरणास्त्रोत श्री. नितीनजी गडकरी साहेबांच्या शुभहस्ते अरविंद सहकारी बॅंक लि.च्या कामठी शाखेचा शुभारंभ होत आहे, याचा मोठा आनंद आहे. ५ ट्रिलीयन इकॉनॉमी आणि जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या मोदीजींच्या प्रयत्नात गडकरी साहेबांचा वाटासुद्धा आहे. श्री. अमित शाह यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र पुनर्जीवित करून त्याचा विकास करण्याचे कार्य फार मोठे आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण सशक्त करण्याचे काम निरंतर होत आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे अरविंद सहकारी बँक लि. ची सेवा १८ मार्च १९९८ ला लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. निरंतर प्रगती करत आज या लोकप्रिय बँकेने विदर्भातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या नावाने कार्यरत अरविंद सहकारी बँक लि. च्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. सातवी शाखा कामठी येथे आज ग्राहक सेवेत रुजू होत आहे. ‘लंच ब्रेक’ न घेता ११ तास आणि रविवारीसुद्धा ग्राहक सेवेचा लाभ कामठी परिसरातील ग्राहकांना घेता येणार आहे. १००० कोटींच्या डिपॉझीटचे उद्दिष्ट बँकेने पूर्ण केले असून बँकेचा टर्नओव्हर १६०० कोटींचा आहे. बँकेसाठी उत्कृष्ट ग्राहक-सेवा सर्वोच्च आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीचे आणखी एक पाऊल म्हणजे कामठी येथे लोकसेवार्थ नवीन शाखा सुरु करून चांगली सेवा देणे आहे. रिझर्व बँकेच्या निर्देशाप्रमाणे डोअर टू डोअर बँकिंग सेवा कामठीवासियांना उपलब्ध करून देणार आहोत. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अरविंद सहकारी बॅंक लि. कामठी शाखा ही सुद्धा ग्राहकांना चांगली सेवा देईल.”

गडकरीजी यांच्या हस्ते QR कोड, PFMS सेवा, नियमित परतफेड करणाऱ्या ग्राहकांना व्याजात ०.२५% सूट आणि इलेक्ट्रिक वेहिकल / सोलरवरील कर्जावरील व्याजात १% सूट अशा ४ नवीन योजनांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. अरविंद सहकारी बॅंक लि., कामठी शाखेच्या उद्घाटन समारंभास परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

  • Related Posts

    अजय देवगन की फिल्म पहले ही दिन बनी तूफान, मिली ‘जाट’ से डबल ओपनिंग

    “Latest news and updates on politics, sports, entertainment, technology, and more. Stay informed with breaking news and in-depth articles.”

    जंग का खतरा बढ़ा तो आसिम मुनीर से इस्तीफा मांगने लगे पाकिस्तानी

    “Latest news and updates on politics, sports, entertainment, technology, and more. Stay informed with breaking news and in-depth articles.”

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान