
*कणखर व अभ्यासू व्यक्तित्व म्हणून दादासाहेबांची ओळख* _कुलगुरू डॉ मालखेडे
*स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांचा पंचविसावा पुण्यस्मरण कार्यक्रम*
नागपूर(प्रतिनिधी)
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.दादासाहेब काळमेघ हे अतिशय कणखर व तितकेच अभ्यासू व्यक्तित्व म्हणून सर्वदूर परिचित आहे. दादासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांनी केले.
नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहत संपन्न झालेल्या स्व .दादासाहेब काळमेघ यांच्या पंचविसाव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून कुलगुरू प्रा . डॉ . मालखेडे बोलत होते. स्व . दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या पुण्यस्मरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कराड येथील अभिमत विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे मुख्य सल्लागार डॉ . वेद प्रकाश मिश्रा आणि डॉ .पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे माजी कुलगुरू डॉ .शरद निंबाळकर यांची उपस्थिती होती .यावेळी विचारपिठावर स्व.दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ,अनंतराव घारड, प्रा .दिनेश सूर्यवंशी, सतीश चिंतलवार, आर. एम.सिंग , स्व .दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे सचिव हेमंत काळमेघ, प्राचार्य डॉ महेंद्र ढोरे, प्राचार्य जयवंत वडते यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व .दादासाहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कुलगुरू दिलीप मालखेडे पुढे बोलताना म्हणाले की दादासाहेबांनी गरिबांना मदत केली आहे.समाजात समानता आणण्यासाठी कुलगुरू म्हणून त्यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आज देशात 80 कोटी लोकांना खायला अन्न नाही त्यांना मोफत जेवण द्यावे लागते,खरंच ही लोक शिक्षण घेण्या च्या परिस्थितीत असेल का ?असा सवाल उपस्थित करून कुलगुरू डॉ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे गरज असल्याचे नमूद केले. अभ्यासक्रमामध्ये बदल करून सामाजिक परिवर्तनाचे काम आपल्याला करावे लागेल तीच दादा साहेबांना श्रद्धांजली असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आपल्या विवेचनात डॉ . वेदप्रकाश मिश्रा यांनी स्व .दादासाहेब काळमेघ यांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. विद्यापीठाला कायद्याचे कवच देणारे दानशूर व्यक्ती म्हणजे दादासाहेब काळमेघ होते.आजही त्यांनी विद्यापीठात तयार केलेला ऑर्डिनन्स संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ वापरताना दिसतात.लोकसेवेचे व्रत घेणारा ,विद्यापीठाला लोक विद्यापीठ बनविणारा ,दूरदृष्टी असणारा ,अभूतपूर्व प्रेरणा असलेला एक अभ्यासक्रम म्हणजे दादासाहेब होय .दादा साहेबांना केवळ भावनिक होऊन श्रद्धांजली देताना चालणार नाही दादासाहेब हे कोहिनूर होते. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे राहिलेले अपूर्ण काम व त्यांनी पाहिलेले स्वप्न मी स्वतः पूर्ण करणार असल्याचा शब्द डॉ .वेद प्रकाश मिश्रा यांनी आपल्या विवेचनातून दिला. दादासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देताना शरद निंबाळकर म्हणाले की, भाऊ साहेबांचा वारसा व वसा दादासाहेबांनी चालविला.बहुजनांना शिक्षण आणि ग्रामीण भागाचा उद्धार हा ध्यास घेऊन हिमतीने व ताकदीने शिक्षणाची मशाल तेवत ठेवली.दादासाहेबांनी चालवलेला वसा हा वैयक्तीक वा कोणत्याही जाती पुरता मर्यादित नव्हता.त्यांच्या सारखे कार्य करण्याची तळमळ आज कोनामध्ये दिसत नाही.म्हणून आज दादासाहेबांच्या आठवणीची गरज असल्याचे निंबाळकर यांनी आपल्या मनोगातून सांगितले.यावेळी प्रा. दिनेश सूर्यवंशी ,शरद काळमेघ यांनीही दादासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. हेमंत काळमेघ यांनी दादासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाशीत केलेला दादा या गौरव ग्रंथाबद्दल माहिती दिली. दादासाहेबांवर तयार झालेला ग्रंथ हा 500 पानाचा असून यामध्ये चार माजी कुलगुरू व आठ माजी कुलसचिवांच्या लेखांचा समावेश आहे.या गौरव ग्रंथासाठी अनेक मोठ्या राजकीय लोकांचे संदेश देखील प्राप्त झाले असून अतिशय वाचनीय व दर्जेदार असा हा ग्रंथ सर्वसामान्यांना उपयुक्त ठरेल असा आशावादही हेमंत काळमेघ यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.महेंद्र ढोरे, संचालन प्रा.मेंढे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन हेमंत काळमेघ यांनी केले.
कार्यक्रमाला स्व.दादासाहेब काळमेघ यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा चाहता वर्ग, शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सभासद ,प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि गणमान्य नागपूरकर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.