
महाराष्ट्रातील लोकांना जेवायला संपूर्ण अन्न लागतं. ज्यात डाळ – भात, भाजी – चपातीचा समावेश आहे. या पदार्थांशिवाय अनेकांना आपण जेवलो आहोत असे वाटत नाही. पण कधी – कधी हेच पदार्थ खाऊन कंटाळा देखील येतो. काहींचं फक्त डाळ – भात खाल्ल्याने देखील पोट भरतं. पण सतत डाळ – भात खाऊन देखील कंटाळा येतो.
डाळ ऐवजी आपण टोमॅटोचा रस्सा ट्राय करू शकता. टोमॅटोचा वापर अनेक भाज्या आणि फोडणीमध्ये केला जातो. टोमॅटोची आंबट – गोड चव प्रत्येकाला आवडते. टोमॅटोचे अनेक पदार्थ केले जातात. पण आपण कधी टोमॅटोचा रस्सा हा पदार्थ खाऊन पाहिला आहे का? टोमॅटोचा रस्सा ही रेसिपी कमी साहित्यात झटपट तयार होते. चला तर मग या चविष्ट आंबट – गोड चवीची पदार्थाची कृती पाहूयात(Maharashtrian Tomato Saar Recipe).