
कृषि महाविद्यालय शिर्ला येथे भव्य “हर घर तिरंगा” बाईक रैलीचे आयोजन….
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथिल राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवकानी शिर्ला गावामध्ये हर घर तिरंगा अभियान या विषयी जनजागृती बाईक रैली काढण्यात आली. हर घर तिरंगा रैलीला श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री नारायण अंधारे व अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे, प्राचार्य डॉ. राम खर्डे यांनी झेंडा दाखवून बाईक रैली चे उद्घघाटन केले.यावेळी कृषि महाविद्यायाचे प्राध्यापक श्री. शैलेश दवणे, प्राध्यापक श्री.गोपाल म. बेद्रे, प्राध्यापकअक्षय देशमुख, प्रा.पंकज देशमुख, प्रा. सौरभ वर्मा, प्रा. राधेश्याम डाखोरे, प्रा. ओम जाधव, सोनल खवणे, संजय गायकवाड, आरती पंचबुद्धे,कल्याणी वानखेडे. व इतर कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यायच्या अंतर्गत स्वतंत्रता का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी 75 व्या वर्धापदिनानिमित्त रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आली या वेळी कृषि महाविद्यालयातील 75 विद्यार्थ्यांनी रक्त दान केले.या वेळीं कृषि महाविध्याल्याचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे उपस्थीत होते.