
भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्राची कार्यकारिणी मध्ये रितेश राहाटे यांची सचिव पदी निवड!
देशाचे लाडके व कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, आमदार प्रविण दटेक, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रच्या कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला.
या कार्यकारिणीमध्ये भाजयुमो प्रदेश सचिव पदी रितेश राहाटे यांची निवड करण्यात आली आहे. या अगोदर ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी काम सांभाळत होते.
रितेश यांनी त्यांच्या नियुक्ती बद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले व भविष्यात पक्षानी दिलेले काम संपुर्ण ताकदीने करण्याची ग्वाही दिली.
कृपया प्रकाशनार्थ,
मा. वृत्तसंपादक.
आपला नम्र,
प्रसाद मुजुमदार,
प्रसिद्धी प्रमुख, भाजयुमो नागपुर महानगर