लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली नवरी, कारण वाचून कराल तिचं कौतुक

Bride Ran Away Before Wedding : लग्नाचा सीझन आला की, अनेक हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. एक नवरी लग्नाच्या एक दिवसआधी घरातून पळून गेली. कारण तिला तिचं शिक्षण पूर्ण होतं आणि तिला यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करायची होती. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये घडली. तरूणीचं लग्न तीन जून रोज मिर्जापुरच्या एका तरूणासोबत होणार होतं. पण लग्नाच्या एक दिवसाआधीच लग्नाचे काही रिवाज पार पाडले जात होते, तेव्हाच नवरी तिच्या घरातून पळून गेली.

कथितपणे जेव्हा नवरीच्या परिवाराला समजलं की, नवरी पळून गेली. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. पण ती सापडली नाही. तिचा पत्ता न लागल्याने वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

दरम्यान, नवरीच्या कुटुंबियांनी आपली बदनामी वाचवण्यासाठी परिवारातील दुसऱ्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवरीच्या परिवाराने नवरदेवाला आणि त्याच्या परिवाराला स्थितीची सूचना दिली. तसेच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. नवरदेव आणि त्याचा परिवार या प्रस्तावावर सहमत झाले. त्यानंतर लग्नही लावण्यात आलं.

कुठे सापडली नवरी?

दुसरीकडे पोलिसांनी पळून गेलेल्या नवरीला शोधलं आणि तिला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, फरार नवरी गावातील एका प्राथमिक विद्यालयात सापडली. जेव्हा तिला पळून जाण्याचं कारण विचारलं तर तिने सांगितलं की, तिला यूपीएससीची तयारी करायची आहे. पण कुटुंबियांनी जबरदस्ती तिचं लग्न ठरवलं होतं. ती पुढे म्हणाली की, तिने तिच्या आईला आधीच सांगितलं होतं की, तिला आयएएस व्हायचं आहे. तरीही ते तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते.  तिने सांगितलं की, ती स्वत:च्या मर्जीने पळून गेली होती आणि कुणीही तिला असं करण्यास भाग पाडलं नाही. अशात पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

  • Related Posts

    महाराष्ट्र के किसानों ने जैव प्रौद्योगिकी अपनाने की मांग की, कपास उत्पादन बढ़ाने पर दिया जोर

    नागपुर.  महाराष्ट्र के…

    नागपुर के जयंत तांदुलकर ने बॉटल आर्ट में बनाया रिकॉर्ड!

    नागपुर. नागपुर के…

    Entertainment With Photo

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    महायुति सरकार का शपथ ग्रहण समारोह गुरुवार 5 दिसंबर को

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    जाधवर इंस्टीट्यूट के 2 हजार छात्रों का प्रधानमंत्री और सैनिकों को पत्र

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    बच्चों के लिए निवेश और वित्तीय योजना पर विशेष व्याख्यान का आयोजन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    मोदी सरकार की नई योजना: असंगठित क्षेत्र के श्रमिकों के लिए 3000 रुपये मासिक पेंशन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    अनिल दादा जाधव के जन्मदिन के अवसर  पर वृक्षरोपण कार्यक्रम का आयोजन

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान

    डॉ. मोहन भागवत को जेजुरी देवस्थान से मानपत्र प्रदान