
कृषि महाविद्यालय शिर्ला च्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केला THE ART OF LIVING चा मंत्र
अकोला: श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिर्ला (अंधारे) संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे श्री श्री रविशंकर यांच्या नेतृत्वाखालील द आर्ट ऑफ लिविंग चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे चार दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम २० जुलै ते २३ जुलै या वेळेत पार पडला गेला. यासाठी द आर्ट ऑफ लिविंग च्या आंतरराष्ट्रीय योगा शिक्षिका अरुणा धवला दीदी यांनी हिंसामुक्त समाज, रोगमुक्त शरीर, संभ्रममुक्त मन, प्रतिबंधमुक्त बुद्धी, आघातमुक्त स्मृती आणि दुःखमुक्त आत्मा हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग हे साध्य करण्यासाठी कशाप्रकारे कटिबद्ध आहे तसेच या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून आपले जीवन आणखी आनंदमय बनवून एक उत्सव म्हणून कसे जगता येईल या बद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच संस्थेच्या सचिव सौ हेमलता ताई कृष्णा अंधारे यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच पुढे या चार दिवसांच्या प्रशिक्षणाध्ये अरुणा धवला दीदी यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम सुदर्शन क्रिया व बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या. युवा पिढी मधील नैराश्य कसे बाहेर काढावे व जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा कसा आनंद घ्यावा याबद्दलचे अनमोल मार्गदर्शन दीदींनी त्यावेळी विद्यार्थ्यांना केले. यानंतर शेवटच्या दिवशी कार्यक्रमाचा समारोप करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णाभाऊ गोविंदराव अंधारे सर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व सकारात्मकतेने हे चार दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले व विद्यार्थ्यांना या गोष्टींचा फायदा कशाप्रकारे झाला त्यांनी त्यांचा अनुभव या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना सांगितला. कार्यक्रमाची सांगता खिचडी व कढी च्या प्रसाद वाटपाने झाली महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि महाविद्यालयात काम करणारी सर्व मंडळी या सर्वांनी खिचडी आणि कढी च्या महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम पांडुरंग खरडे सर, माननीय प्रा. रोहित शेखर कनोजे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रा. कल्याणी वानखडे मॅडम, प्रा. बेद्रे सर, प्रा. वर्मा सर, प्रा. दवणे सर, प्रा. पंकज देशमुख सर, प्रा. अक्षय देशमुख सर, प्रा. ओम जाधव सर, प्रा. गायकवाड सर, प्रा. डाखोरे सर, प्रा. धाडकर सर, प्रा. पोरे मॅडम, प्रा. खवने मॅडम, प्रा. पान्हेरकर मॅडम, प्रा. पंचबुद्धे मॅडम, प्रा. राऊत मॅडम तसेच महाविद्यालयातील कर्मचारी श्री महल्ले सर, देशपांडे मॅडम, श्री वाकोडे सर, श्री मंजुळकर सर, घुगे मॅडम, श्री आवटे सर, श्री हर्षल जाधव सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले तसेच गजानन आवटे यांनी तबला वादन करुन संगीतमय साथ दिली, कुलदीप अंधारे, प्रमोद महल्ले, शुभम महल्ले, शुभम वसतकार, हर्षल वसतकार,आदित्य महल्ले, गौरव महल्ले, यश जैन, प्रमोद लांडकर यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले