
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता १६ हजार रुपये मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार देण्यात येमार आहे, यासाठी १५०० कोटींना मान्यता देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीही सरकारने निर्णय घेतला असून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढविली आहे.